मूलभूत अर्थछटा (गाभा)

1.अकर्मक क्रियापदधातुरूपあがる、上がる
व्यक्ती किंवा प्राणी यांचे खालून वरच्या दिशेने स्थलांतर होणे: स्थलांतराच्या ध्येयस्थळाचा उल्लेख
उदाहरणे
山手線のホームに上がる。
यामानोते रेल्वेच्या प्लॅटफॉर्मवर प्रवेश करणे. (यामानोते हे एका रेल्वेलाईनचे नाव आहे.)
展望台へ上がる。
ऑब्झर्वेशन डेकवर चढणे.
勝手にステージに上がらないでください。
परवानगीशिवाय स्टेजवर चढू नये.
舞台に上がってトロフィーを受け取った。
(मी) स्टेजवर जाऊन करंडक स्विकारला.
屋根に上がるのはあぶないよ。
छ्परावर चढणे धोकादायक आहे बरं का!
天気がよかったので屋上に上がってみると、遠くに富士山が見えた。
आकाश/हवा निरभ्र असल्यामुळे गच्चीवर जाऊन बघितले तर लांबवर फुजी पर्वत दिसला.
stairsネコが屋根にあがって、日向ぼっこをしている。
एकत्र वापरले जाणारे शब्द
ध्येयस्थळ
1.舞台(व्यासपीठ)・ステージ(स्टेज)・檀上・表彰台(podium, पोडियम)・リング(रिंगण)・屋根(छ्प्पर/छत)・屋上(गच्ची)・甲板(डेक)
2.~の上(च्या वर):舞台の上(व्यासपीठावर)・屋根の上(छ्परावर)
आनुषंगिक क्रियाविशेषणे
ゆっくり(と)(सावकाश)(सुमो मल्ल संथपणे कुस्तीच्या रिंगणामधे उतरला.) そろそろ(と)हळूहळू, संथपणे, सावकाश
आनुषंगिक माहितीजपानी भाषेमधे रिंगणामधे 'चढणे' असे क्रियापद वापरलेले असले तरी मराठीमधे रिंगणामधे 'उतरणे' हे क्रियापद वापरतात.
स्पष्टीकरण
"खेळाडू खेळण्याच्या जागी चढणे (आगारू)" याचा "तो खेळ खेळण्याच्या जागी प्रत्यक्ष खेळ खेळणे" असा व्यापक अर्थ होतो. उदहरणार्थ 、「あの力士は15歳から土俵にあがっている」(’तो पहिलवान वयाच्या १५ व्या वर्षापासून सुमोच्या रिंगणात उतरत आहे’), 「最終回は、A投手がマウンドにあがるだろう’शेवटच्या इनिंगमधे(डावात) A हा खेळाडू माउंडवर जाईल असे वाटते.
आनुषंगिक माहितीसुमो हा खेळ जाड दोरखंड जमिनीमधे गाडून आखलेल्या रिंगणामधे खेळला जातो. या रिंगणाला 'दोह्यो' असे म्हणतात. बेसबॉल या खेळामधे चेंडू फेकण्याची जागा ही टेकडीसारख्या आकाराची केलेली असते त्याला 'माउंड' असे म्हणतात.
चूकीच्या वापरासंबंधीतचे स्पष्टीकरण
कार मध्ये वगैरे वाहनात चढताना (एका अर्थाने) जमिनीपासून थोड्याश्याच का होईना उंचावरील जागी जातो. परंतु जपानी भाषेत 「自動車にあがる」असे न म्हणता 「自動車に乗る/乗り込む」असे म्हणतात. येथे あがる हे क्रियापद न वापरता 乗る/乗り込む हे क्रियापद वापरतात.
आनुषंगिक माहितीमराठीत मात्र वाहनात 'चढणे'/'चढून बसणे' असा वापर होतो.
समानार्थी / विरुद्धार्थी शब्द
समानार्थीのぼる
विरुद्धार्थी शब्दくだる、さがる、おりる


2.अकर्मक क्रियापदधातुरूपあがる、上がる
व्यक्ती किंवा प्राणी यांचे खालून वरच्या दिशेने स्थलांतर होणे: 'स्थलांतराच्या मार्गा'चा उल्लेख
उदाहरणे
老人はゆっくりと階段を上がっていった。
वयस्कर व्यक्ती हळुहळू पायऱ्या चढून वर गेली.
車が猛スピードで坂道を上がってきた。
कार अतिशय वेगाने चढण चढून वर आली.
花子は、山頂への道を上がりはじめた。
हानाको ने पर्वत शिखराकडे जाण्याचा रस्ता चढायला सुरवात केली.
石段をあがって、神社の境内に入った。
दगडी पायऱ्या चढून जिंजा च्या प्रांगणात प्रवेश केला.
この年になると、ちょっとした坂道をあがるだけでも息が切れる。
या वयात थोडीशी चढण चढल्यावरसुद्धा धाप लागते.
この坂を上がったところに病院があります。
हा चढ चढून गेलात की पुढे हॉस्पिटल आहे.
stairs「そちらの階段をあがって左にございます。」
stairs中村さんが階段をあがっていきます。
stairs中村さんが階段をあがってきます。
stairs中村さんが急いで階段をあがっていきます。
stairs中村さんが急いで階段をあがってきます。
एकत्र वापरले जाणारे शब्द
मार्ग
階段(जिना), 石段(दगडी पायऱ्या/जिना), 坂(चढ). 坂道(चढण), 参道(जिंजा कडे जाणारा मार्ग)
आनुषंगिक माहितीजिंजा म्हणजे 'शिंतो' मंदिर
आनुषंगिक क्रियाविशेषणे
सावकाश (चढण सावकाश चढणे), एका दमात (एका दमात चढ चढणे)
बरोबर न येणारे शब्द
मार्ग
  切り立った崖を(命がけで)あがる हा चुकीचा वापर आहे
  切り立った崖を(命がけで)のぼる/よじのぼる हा योग्य वापर आहे.
आनुषंगिक माहितीडोंगर/ कडा यासंदर्भात あがる (वर जाणे) न वापरता のぼる (चढणे) हे क्रियापद वापरतात.
स्पष्टीकरण
「あがる」हे क्रियापद「彼はゆっくりと坂道をあがっていった/きた (तो संथपणे चढ चढून गेला/आला)」या वाक्यात दर्शविल्याप्रमणे「~ていく/てくる」या स्वरुपात वापरतात.
चूकीच्या वापरासंबंधीतचे स्पष्टीकरण
[[विशिष्ट प्रकारच्या वापरा संबंधी「階段を二階にあがる」असे म्हणणे अवघड जाते. कारण 「あがる」च्या बाबतीत एकाचवेळी <経路= मार्ग > सूचित करणारा を आणि <到着点=ध्येय स्थळ> सूचित करणारा 「に」हे प्रत्यय वापरता येत नाहीत. अशावेळी 「階段をのぼって二階にあがる」「階段を使って二階にあがる」「階段で二階にあがる」अशा प्रकारे वापर होतो.
समानार्थी / विरुद्धार्थी शब्द
समानार्थीのぼる
विरुद्धार्थी शब्दくだる、さがる、おりる


3.अकर्मक क्रियापदधातुरूपあがる、上がる
व्यक्ती किंवा प्राणी यांचे खालून वरच्या दिशेने स्थलांतर होणे
उदाहरणे
船員たちは、半年ぶりに陸(おか)にあがった。
खलाशी सहा महिन्यानंतर जमिनीवर (किनाऱ्यावर) उतरले.
池からカメが上がってきた。
तलावातून कासव वर आले.
風呂からあがった祖母が浴衣姿で現れた。
आजी युकाता घालून स्नानगृहातून बाहेर आली.
आनुषंगिक माहितीयुकाता: हलका सुती किमोनो.
海から岸にあがると、急に疲労感が襲ってきた。
समुद्रातून किनाऱ्यावर आल्यावर एकदम खूप थकवा आला.
風呂からあがって飲むビールほどうまいものはない。
स्नान करुन झाल्याझाल्ल्या प्यायलेल्या बियर इतके चविष्ट दुसरे कोणतेही पेय नाही.
プールから上がって体をふいた。
पोहण्याच्या तलावातून बाहेर आल्यावर अंग पुसले.
एकत्र वापरले जाणारे शब्द
आरंभस्थळ
プール(तलाव, (海) समुद्र, (水) पाणी, (風呂) टब / हौद, (お)(湯) गरम पाणी,
ध्येयस्थळ
陸जमीन (おかटेकडी), 岸) किनारा /ती) ,岸壁) (बोटीचा) धक्का/बंधारा, (島)
बरोबर न येणारे शब्द
आरंभस्थळ
  子供がビニールプールからあがる हा चुकीचा वापर आहे
  子供がビニールプールから出る हा योग्य वापर आहे.मुलगा प्लास्टिक च्या (स्वीमिंग) पूल मधून बाहेर पडतो. यासाठी あがる ऐवजी 出る बाहेर येणे/पडणे हे क्रियापद वापरतात.
आनुषंगिक माहितीビニールプールम्हणजे (प्लास्टिक) चा हवा भरून फुगवटा येणारा लहान मुलांचा स्वीमिंग पूल.
स्पष्टीकरण
समुद्र, नदी हे जमिनीपेक्षा खालच्या पातळीवर असतात आणि बाथटब हा सर्वसाधारणपणे अंग धुण्याच्या जागेपेक्षा खालच्या पातळीवर असतो. ’त्यामुळे पाण्यातून जमिनीवर येणे’ म्हणजे सर्वसाधारणपणे ’खालून वर झालेले स्थलांतर’. परंतु「風呂からあがる」 या विधानाचा अर्थ केवळ ’टबामधून अंग धुण्याच्या जागेकडे झालेले स्थलांतर’ इतकाच नसून ’स्नानगृहातून बाहेर येणे’ असाही होऊ शकतो. या ठिकाणी 、「風呂」या शब्दाचा अर्थ केवळ ’टब’ असा नसून त्याचा ’स्नानगृह’ असाही अर्थ ध्वनित होतो. त्यामुळे स्थलांतराचे आरंभस्थळ ’टबासहित स्नानगृह’ असे होते. त्यामुळे या विधानाचा अर्थ ’खालून वर येणे/ स्थलांतर होणे’ यापेक्षाही काहीसा ’आतून बाहेर येणे/ स्थलांतर होणे’ असा होतो.
समानार्थी / विरुद्धार्थी शब्द
समानार्थीでる
विरुद्धार्थी शब्दはいる


4.अकर्मक क्रियापदधातुरूपあがる、上がる
(एखाद्या व्यक्तीने) बाहेरून घरात प्रवेश करणे
उदाहरणे
どうぞおあがりください。
या, आत या. सुस्वागतम.
遠慮しないであがって。
संकोच करु नका. आत या.
太郎はこっそり花子の家に上がった。
तारो ने गुपचूप हानाको च्या घरात प्रवेश केला.
田中さんが、部屋に上がらせてくれと言うので困った。
तानाका (मला तुझ्या) घरात येऊ दे म्हणाल्याने माझी पंचाईत झाली.
先生の家にあがって、お茶をごちそうになった。
शिक्षकांच्या घरी गेलो व तेथे चहा मिळाला.
座敷に上がるなり、座り込んでしまった。
झाशिकीवर पोहोचताच ताबडतोब बैठक मारली.
आनुषंगिक माहितीझाशिकी म्हणजे जपानी पद्धतीची तातामि (चटई) अंथरलेली खोली
stairs「いらっしゃい。どうぞ、あがってください。」 
एकत्र वापरले जाणारे शब्द
घराचा अंतर्भाग
家 (घर), 座敷 (झाशिकि (=जपानी पद्धतीची तातामि (चटई) अंथरलेली खोली)、
आनुषंगिक क्रियाविशेषणे
गुपचुप (गुपचुप खोलीमध्ये प्रवेश करणे), अशिष्टपणे, परवानगी न घेता, लापरवाहीने, (अशिष्टपणे पादत्राणे न काढता खोलीत घुसणे)
बरोबर न येणारे शब्द
इमारत/बिल्डिंग च्याबाबतीत 「ビルにあがる」असे न म्हणता 「ビル(の中)に入る」'इमारतीत प्रवेश करणे' असे म्हणतात.
स्पष्टीकरण
बाहेरून घरात प्रवेश करणे या अर्थाने देखील 「あがる」चा वापर करता येतो. कारण की, मूलतः घराचा आतील भाग बाहेरील भागापेक्षा जास्त उंचावर असल्याने ’वरील दिशेत होणारे स्थलांतर’ आणि ’आतील दिशेत होणारे स्थलांतर’ हे एकाच वेळी होते. 「縁側(えんがわ) (ओसरी)にあがる」या उदाहरणात ’वरील दिशेत होणारे स्थलांतर’ आणि ’आतील दिशेत होणारे स्थलांतर’ हे हे एकत्र घडत आहे असे समजले जाऊ शकते कारण 「縁側 (ओसरी)」ही 「庭(にわ)अंगण」पेक्षा उंचावर असते आणि ती घराचा एक भागही असते. परंतु हल्ली 「あがる」हे असा उंचीतला फरक नसलेल्या घराच्या बाबतीतही ’घरात प्रवेश करणे’ या अर्थी वापरले जाते.
घरातली व्यक्ती स्वतःच्या घरात जेव्हा प्रवेश करते तेव्हा त्यासाठी 「あがる」वापरता येईल का? एखादी व्यक्ती अंगणातील गवत काढत असताना अचानक पाऊस आला तर अशा परिस्थितीत 「家にあがった」 असे न म्हणता「雨が降ってきたので、あわてて家に入った」('पाऊस आल्यामुळे गोंधळून जाऊन घरात गेलो.') असे म्हणण्याचा प्रघात आहे. अशा रितीने 「あがる」 चा 'घरात प्रवेश करणे' हा मुख्य अर्थ कर्ता हा पाहुणे इत्यादी संबंधीत घराच्या रहीवास्यांव्यतीरिक्त व्यक्तींच्या बाबतीत होतो.
समानार्थी / विरुद्धार्थी शब्द
समानार्थीはいる
विरुद्धार्थी शब्दでる


5.अकर्मक क्रियापदधातुरूपあがる、上がる
शरीराचा एखादा अवयव किंवा वस्तूचा एखादा भाग वर होणे/जाणे **undefined
उदाहरणे
手紙をお届けにあがる。
पत्र पोहोचते करण्यासाठी एखाद्याच्या घरी जाणे.
店の者がお客様のお宅にご購入品をお届けにあがった。
दुकानदार ग्राहकाच्याघरी माल पोहोचवण्यासाठी गेला.
ご相談にあがってもよろしいでしょうか。
आपल्याकडे सल्ला घेण्यासाठी आले तर चालेल का?
注文いただいた商品をお届けにあがりました!
आपण मागवलेल्या वस्तू देण्यासाठी आलो आहे!
商品をお届けにあがったあとは、すぐに帰りました。
वस्तू पोहोचवायला (तुमच्या घरी) आल्यानंतर ताबडतोब परतलो.
あとで山田さんにお願いにあがるつもりです。
नंतर श्रीयुत यामादायांना विनंती करण्यासाठी आपल्या घरी येण्याचा इरादा आहे.
stairs先生のお宅にお迎えにあがった
एकत्र वापरले जाणारे शब्द
इतर व्यक्तीची जागा/ठिकाण
तुमचे /आपले (आदरार्थी ) घर
ध्येय
पोहोचते करणे, विचार-विनिमय (सल्ला-मसलत), गाडीने वगैरे आणायला जाणे
स्पष्टीकरण
या अर्थाने वापरले जाणारे 「あがる」हे क्रियापद 「訪問する」(एखाद्या स्थळास भेट देणे) याचे नम्रता दर्शक (humble) स्वरूप आहे.
आनुषंगिक माहितीअर्थ क्र. ४ ’(एखाद्या व्यक्तीने) बाहेरून घरात प्रवेश करणे’ याचे हे विशिष्ट प्रकारचे (अर्थव्याप्ती मर्यादित असलेले) उदाहरण म्हणता येईल.
समानार्थी / विरुद्धार्थी शब्द
समानार्थी参る、参上する
विरुद्धार्थी शब्द


6.अकर्मक क्रियापदधातुरूपあがる、上がる、挙がる、揚がる
शरीराचा एखादा अवयव किंवा वस्तूचे वरच्या दिशेत स्थलांतर.
उदाहरणे
stairs力士の足が出た瞬間、行司の軍配がさっとあがった
एकत्र वापरले जाणारे शब्द
शरीराचा अवयव, वस्तूचा एक भाग
手(हात), 肩 (खांदा), 足 (पाय), 幕 (पडदा), 軍配 (सुमोच्या पंचांच्या हातातील पंखा), 遮断機 (रेल्वेचे फाटक)
आनुषंगिक क्रियाविशेषणे
एकदम/एकाच वेळी (एकाच वेळी सर्वांचे हात वर गेले), एकदम/अचानक (सुमोच्या पंचांच्या हातातील पंखा पूर्वेकडच्या (मल्लाच्या) दिशेत वर गेला (म्हणजे पुर्वेकडून रींगणात उतरलेल्या मल्लाचा विजय झाला)), एकामागून एक (एकामागून एक हात वर गेले/झाले), उंच उंच (मुख्य पंचांचा हात वर वर गेला), झटकन (पडदा झटकन वर जाणे)


7.अकर्मक क्रियापदधातुरूपあがる、上がる、挙がる、揚がる
एखादी संपूर्ण वस्तू उंच जागी/ वर जाणे
उदाहरणे
1万発の花火が上がった。
दहा हजार दारु गोळ्यांची बनलेल्या शोभेच्या दारूची आकाशात उधळण झाली.
メインポールに国旗があがった。[オリンピックなどの表彰式]
मुख्य स्तंभावर राष्ट्रध्वज फडकला. (ऑलिंपिक इत्यादीमधील पदक प्रदान समारंभामधे)
太郎の凧が一番高くあがっている。
तारोचा पतंग सर्वात उंच गेला आहे.
遠くで旗が上がったのがみえた。
दूरवर ध्वज फडकताना दिसला.
蹴ったボールが高くあがった。
पायाने मारलेला (किक केलेला) चेंडू उंच गेला.
あがった球の行く先を、観客はじっと見つめた。
वर जाणाऱ्या चेंडूचा मार्ग प्रेक्षक टक लावून पहात होते.
stairs夏の夜空にきれいな花火があがっている
stairs色とりどりの風船が空高くあがっていきます。
एकत्र वापरले जाणारे शब्द
संपूर्ण वस्तू
पतंग, पतंग, ad-balloon (जाहिरातीसाठीचा फुगा), ध्वज, राष्ट्रध्वज, चेंडू, फ्लाय (fly/fly ball in baseball), बॅटने मारलेला चेंडू, फटाका (शोभेची दारू)
आनुषंगिक क्रियाविशेषणे
सरसर (झेंड्याचे सरसर वर जाणे), 次第に= सावकाश (पतंगाचे सावकाश उंचावर जाणे), 次々(と)= उंच उंच (फ्लाय/ बॅटने मारलेला चेंडू वर जाणे [बेसबॉल मधील])
बरोबर न येणारे शब्द
संपूर्ण वस्तू
विमान, हेलिकॉप्टर
स्पष्टीकरण
बेसबॉल मध्ये 'फ्लाय वर जाणे' याचा अर्थ फक्त 'चेंडू' सारखी वस्तू वर जाणे असा नसून त्यात त्या चेंडूने वर जाताना आक्रमिलेला मार्ग (trajectory) सूचित होतो.


8.अकर्मक क्रियापदधातुरूपあがる、上がる
(पाण्याची व्याप्ती/पातळी ) उंच जागेवर पोहोचणे
उदाहरणे
川の水位が上がった。
नदीच्या पाण्याची पातळी वाढली.
水が腰まで上がってきた。
पाणी कमरेपर्यंत चढत आले.(पाण्याची पातळी कमरेपर्यंत वाढत आली.)
川の水位が上がっていく様子が放送された。
नदीच्या पाण्याची पातळी वाढत जात असल्याचे द्र्श्य प्रक्षेपित केले गेले.
水位が上がり、とても危険だ。
पाण्याची पातळी वाढून फारच धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे.
海の水位が上がったら、この島は沈没してしまう。
समुद्राची पातळी वाढली तर हे बेट पाण्याखाली बुडून जाईल.
एकत्र वापरले जाणारे शब्द
पाण्याची व्याप्ती
पाण्याची पातळी, समुद्राचा पृष्ठभाग, भरती (समुद्राची), पाणी
आनुषंगिक क्रियाविशेषणे
झपाझप (पाण्याची पातळी झपाझप वर चढणे), एकदम/खूपच, एकदम, निश्चितपणे (firmly), आणखीनच, पुढेपुढे/ उत्तरोत्तर, जास्त-जास्त
बरोबर न येणारे शब्द
「川の水位があがる」असे आपण म्हणू शकतो, पण साधारणपणे 「川があがる」असा वापर होत नाही.
स्पष्टीकरण
’एखादी संपूर्ण वस्तू उंच जागी/ वर जाणे’ (अर्थ क्र. ७) या अर्थाबाबत जाहिरातीसाठीच्या फुग्याच्या संदर्भातील उदहरण (「アドバルーンがあがる」) बघितले तर तो फुगा वर गेल्यावर अर्थातच तो मूळच्या ठिकाणी रहात नाही. याउलट पाण्याच्या पातळीबाबतच्या उदाहरणात (「水位があがる」) पाण्याच्या मूळच्या व्याप्तीत भर पडून ती मुळातल्या पातळीच्या पेक्षा वर गेल्याचेही सूचित होते. वेगळ्या शब्दात सांगायचे झाले तर, पाण्याची व्याप्ती वरच्या दिशेने वाढणे सूचित होते. या दोन 「あがる」मध्ये ’एखादी गोष्ट आहे त्यापेक्षा उंच जागी जाणे’ ही बाब समान आहे परंतु ’मूळ स्थितीत न रहाणे’ आणि ’मूळ स्थितीही तशीच कायम रहाणे’ हा या दोन उदाहरणात फरक आहे.
समानार्थी / विरुद्धार्थी शब्द
समानार्थी増す(水位が増す)
विरुद्धार्थी शब्दさがる


9.अकर्मक क्रियापदधातुरूपあがる、上がる
वायूरूप पदार्थाचे अवतरणे (वायुरूप पदार्थ दृष्टोत्पतीस येणे/दिसणे)
उदाहरणे
「あの建物から煙があがってるよ!」
त्या इमारतीमधून धूर येतोय!
青空に煙があがっている。
निळ्या आकाशात धूर दिसत आहे.
川の向こうでのろしが上がった。
नदीपलीकडे खुणेसाठी केलेला जाळ दिसत आहे.
風呂上りの体から湯気が上がっている。
स्नानगृहातून बाहेर पडल्यावर शरीरातून वाफा येत आहेत.
太郎は火の手があがったほうに向かって走った。
तारो ज्वाळा दिसत असलेल्या दिशेने पळत गेला.
煙があがり、焦げ臭いにおいがした。
धूर आल्याने जळका वास आला.
stairs工場の一角から火の手があがり、またたく間に燃え広がった。
stairs煙突から白い煙があがっています。
एकत्र वापरले जाणारे शब्द
डोळ्यांनी दिसणारा वायुरूप पदार्थ
煙 (धूर), 白煙 (पांढरा धूर), 黒煙 (काळा धूर), 土煙 [धूळ (धुळीचा लोट)], 湯気 (वाफ), 火の手 (ज्वाळा), 火柱 (आगीचा डोंब), 炎 (ज्वाला) , 狼煙(のろし)खुणेसाठी केलेला जाळ
आनुषंगिक क्रियाविशेषणे
लोट येणे (धुराचे लोट येणे)
बरोबर न येणारे शब्द
धुके (霧), विरळ धुके [靄(もや)] अशा नैसर्गिक गोष्टींबाबत 「霧があがる」असे न म्हणता 「霧が立ちこめる」असे म्हणतात.
स्पष्टीकरण
「土煙があがる」 (धुळीचा लोट उडणे)「火の手があがる」(ज्वाला उफाळून येणे) या बाबतीत ’एखादी अस्तित्वात असलेली वस्तू/गोष्ट वर जाणे’ अशा अर्थापेक्षा सुद्धा ’ एखादी आत्तापर्यंत नसलेली गोष्ट खालून (जमिनी लगतच्या जागेकडून) बऱ्यापैकी वर म्हणता येईल इतक्या उंचावर जाणे (जाताना दिसणे)’ असा घेतला जातो. हा अर्थ आणि अर्थ क्र. ८「水の範囲が高い位置に至る」शी काही अंशी समान म्हणता येतील. याचे कारण असे की「水位があがる」मध्ये जर आपण पाण्याच्या वाढ झालेल्या भागावरच लक्ष केंद्रित केले तर आत्ता वाढलेल्या (पाण्याच्या) भागात याआधी पाणी नव्हते. वेगळ्या शब्दात सांगायचे झाले तर, या (पाणी वाढलेल्या) भागाचा विचार केला तर या भागात ’पाणी नव्याने दृष्टोत्पत्तीस आले’ असे म्हणता येईल.
समानार्थी / विरुद्धार्थी शब्द
समानार्थी出る(体から湯気が出ている)
विरुद्धार्थी शब्द収まる(火の手が収まる)


10.अकर्मक क्रियापदधातुरूप上がる、揚がる
भौतिकदृष्ट्या आवाजाची निर्मिती होणे
उदाहरणे
突然の銃声に叫び声が上がった。
अचानक झालेल्या बंदुकीच्या फैरीच्या आवाजाने किंचाळ्यांचा कल्लोळ झाला.
人気歌手の登場に歓声が上がった。
सुप्रसिद्ध गायकाचे/गायिकेचे आगमन होताच {शिट्ट्या व आरोळ्यांचा वर्षाव झाला/ आनंदाचा जल्लोष झाला}.
突然の落雷に、四方八方から悲鳴があがった。
अचानक वीज पडल्याने चोहीकडे आर्तस्वरांचा कल्लोळ माजला.
手品をみている子供たちから、驚きの声が上がった。
जादू पहात असलेल्या मुलांच्या तोंडातून आनंदाश्चर्योदगार उमटले/बाहेर पडले.
日本チームが先制ゴールを決めると、スタンドから歓声があがった。
जपानच्या संघाने सुरवातीचा गोल करताच स्टँडमध्ये जल्लोष झाला.
stairs日本の選手がシュートを決めると、スタンドから歓声があがった
एकत्र वापरले जाणारे शब्द
आवाज/ध्वनी
1. ~करणारा आवाज/स्वर/सूर/उद्गार:驚きの声(आश्चर्योद्गार), 怒りの声 (राग व्यक्त करणारा सूर), 不満の声(असंतोष व्यक्त करणारा सूर), 抗議の声(विरोधाचा सूर), 批判の声(टीकेचा सूर), 非難の声(दोषारोपाचा सूर), 感嘆の声(कौतुकोद्गार), 疑問の声(शंकेचा सूर), 落胆の声(नाउमेदचा सूर) उमटणे/ उठणे, [鬨(とき=युद्ध)の声] युद्धाची आरोळी
2.~आवाज/आवाज~:声(आवाज), 歓声(प्रोत्साहन, आरोळी), 喚声(आनंदोद्गार, आरोळी), 産声(नवजात अर्भकाचे जन्मल्याबरोबरचे पहिले रडणे), 胴間声(जाड /खर्जातला आवाज), 叫び声(किंकाळी), 笑い声(हास्योद्गार), 掛け声(हाक), 悲痛な声 (दुःखाचा उसासा, आर्ततेची हाक), 声援 (प्रोत्साहनात्मक आरोळ्या (चियरींग))
3.इतर: किंकाळी, किंचाळी (आश्चर्ययुक्त) येणे , आरडा ओरडा/गोंधळ गडबड होणे
आनुषंगिक क्रियाविशेषणे
एकाचवेळी/एकदम (एकदम निराशेचा सूर उमटणे), अचानक (आरोळी होणे/उठणे)
बरोबर न येणारे शब्द
व्यक्तीच्या आवाजव्यतिरिक्त (उदा. स्फोटाचा आवाज) इतर आवाजाच्या बाबतीत या क्रियापदाचा उपयोग होत नाही.
स्पष्टीकरण
येथील ’(भौतिकदृष्ट्या) आवाज होणे’ हा अर्थ अर्थ क्र. ९ 「気体の出現」(=वायूरूप पदार्थाचे अवतरणे (वायुरूप पदार्थाचे दृष्टोत्पतीस येणे/दिसणे) याचा विस्तरित अर्थ म्हणता येईल. कारण या दोन्हीमध्ये ’नसण्याकडून असण्याकडे’ म्हणजेच ’आत्तापर्यंत नसलेल्या गोष्टीचे दृष्टोत्पत्तीस येणे’ या बाबतीत एकवाक्यता आहे. परन्तु यातील एक गोष्ट (वायुरूप पदार्थाचे दृष्टोत्पतीस येणे) दृष्टीने जाणवते तर दुसरी गोष्ट (आवाजाची निर्मिती होणे) श्रवणाने जाणवते असा फरक आहे. अशा रितीने हा ’दृष्टी → श्रवण’ असा विस्तार म्हणता येईल.
समानार्थी / विरुद्धार्थी शब्द
समानार्थी出る、聞かれる(不満の声が出る
विरुद्धार्थी शब्द収まる(不満の声が収まる)


11.अकर्मक क्रियापदधातुरूप上がる、揚がる
मत देणे /आर्जव होणे
उदाहरणे
大地震をきっかけに、原子力発電に疑問の声があがった。
मोठा भूकंप झाल्यापासून आण्विक वीजनिर्मिती बाबत शंकेचा सूर उमटला आहे.
会社の方針転換に、社員達から不満の声があがり始めている。
कंपनीच्या धोरणातील बदलाबाबत कर्मचाऱ्यांमध्ये असंतोषाचा सूर उमटू लागला आहे.
知事の政策に、県民から抗議の声があがった。
राज्यप्रमुखांच्या धोरणांबद्दल राज्यातील नागरिकांमधून विरोधाचा सूर उमटत आहे.
増税反対の声が上がっているのにもかかわらず、大統領は増税を決定した。
करवाढीला होणाऱ्या वाढत्या विरोधाला न जुमानता राष्ट्राध्यक्षांनी करवाढ करण्याचा निर्णय घेतला.
日本の外交政策に対して、アジア諸国から非難の声があがっている。
जपानच्या परराष्ट्र धोरणाविरुद्ध आशियातील विविध देशांकडून विरोध उमटत आहे.
多くの国民から雇用拡大を求める声があがっている。
अनेक नागरीकांकडून रोजगाराच्या संधी वाढवून मिळण्यासाठी आवाज उठत आहे.
एकत्र वापरले जाणारे शब्द
मत
(विशेषणात्मक शब्द+)आवाज/सूर: 怒りの声 (राग व्यक्त करणारा सूर), 不満の声(असंतोष व्यक्त करणारा सूर), 抗議の声(विरोधाचा सूर), 批判の声(टीकेचा सूर), 非難の声(दोषारोप/टीकेचा सूर), 疑問の声 (शंका /प्रश्नार्थक/संशयाचा सूर)
बरोबर न येणारे शब्द
「怒りの声」असे 「विशेषणात्मक शब्द+声」या स्वरुपात वापरले जाते. 「怒りがあがる」असे म्हणत नाहीत.
स्पष्टीकरण
अर्थ क्र. १० हा ’काही भावना, मत किंवा विनंती’ वगैरे व्यक्त करणारा ’सूर/शब्द’ अनेक व्यतींकडून प्रकट होणे हे सूचित करतो तर अर्थ क्र. ११ हा ’व्यक्तींच्या तोंडून व्यक्त होण्यापेक्षा’ ’काही भावना, मत किंवा विनंती’ वगैरे ’उद्भवणे’ यावर भर देतो. त्यामुळे अर्थ क्र. ११ मध्ये लेखी स्वरूपात व्यक्त होणे, सर्वेक्षणामुळे एखादी गोष्ट स्पष्ट होणे अश्या अर्थांचाही समावेश होतो.
समानार्थी / विरुद्धार्थी शब्द
समानार्थी出る(雇用拡大を求める声が出る)
विरुद्धार्थी शब्द収まる(雇用拡大を求める声が出る)


12.अकर्मक क्रियापदधातुरूपあがる、上がる
संख्या/प्रमाण वाढणे
उदाहरणे
また、ガソリンの価格があがった。
पेट्रोलची किंमत परत वाढली.
株価があがった。
शेयरचे भाव वधारले/शेअर वधारला.
なかなかテンションがあがらない。
उत्साह काहीकेल्या वाढत नाही.
आनुषंगिक माहिती येथे टेन्शन हा इंगज्री शब्द उत्साह या अर्थाने वापरलेला आहे तणाव या अर्थाने नाही याची नोंद घ्यावी. विशेषतः तरुण पिढीतテンションが高い・低いअसा शब्दप्रयोग उत्साही/अनुत्साही व्यक्तीकरता केला जातो.
石油の値段があがっているので困る。
पेट्रोलियम तेलाची किंमत वाढत असल्यामुळे पंचाईत झाली आहे.
午後になると温度が数度上がったように感じた。
दुपार झाल्यावर तापमान काही अंशांनी वाढल्याचे जाणवले.
体温が上がっていくのが肌でわかる。
शरीराच्या तापमानात होणारी वाढ जाणवतेय.
आनुषंगिक माहितीはだでわかるया शब्दप्रयोगाचा विस्तारीत अर्थ प्रत्यक्ष अनुभवातून एखादी गोष्ट व्यवस्थित समजणे असा आहे.
एकत्र वापरले जाणारे शब्द
संख्या/प्रमाण
1.価格(मूल्य): 値段(किंमत/दर), 値(ね)(मोल), 価格(मूल्य), 料金(भाडे), 地価(जमिनीची किंमत), 単価(दर), 物価(भाव), 株価 (समभाग (शेअर) चे मूल्य), 株(समभाग (शेअर)), 相場(があがる)(बाजारमूल्य (वाढणे))
2.賃金(वेतन):賃金(वेतन/मजुरी), 給料(वेतन/पगार), 時給(があがる)(तासावर मिळणारे वेतन (वाढणे))
3.温度(तापमान):温度(तापमान), 気温(तापमान (वातावरणाचे/हवेचे)), 体温(तापमान (शरीराचे)), 水温(तापमान (पाण्याचे)), 熱(があがる)(ताप (वाढणे))
4.速さ(वेग): スピード(स्पीड), 速度(वेग/वेगाचा दर), ピッチ(があがる)(पिच/तीव्रता) (वाढणे)]
5.比率(प्रमाण): 確率(शक्यता), 出生率(जन्म दर), 失業率(बेकारीचे प्रमाण/बेकारी), 生存率(आयुर्मर्यादा/आयुर्मान), 心拍数[हृदय-स्पंदन (हृदय/छातीची धडधड/ठोके)],
6.度合(~度)[प्रमाण(~प्रमाण)]:濃度 (concentration/तीव्रता (एखाद्या द्रावणाची), 精度(अचूकता), 好感度(अनुकूलता), 知名度(लोकप्रियता), 血圧(रक्तदाब/B.P.), テンション[तणाव (टेन्शन)]
7.(७) 年齢(वय): 年齢(वय), 学年(इयत्ता)
आनुषंगिक क्रियाविशेषणे क्रिया
どんどん(वेगाने), さらに(आणखी), ぐんと(=लक्षणीयरित्या, विलक्षण)(スピードがぐんとあがる=वेग विलक्षण वाढणे), ぐっと(एकदम/चांगलाच)(ぐっと好感度があがる= लोकप्रियता एकदम/चांगलीच वाढणे, ぐんぐん(=झटकन)(ぐんぐん気温があがるतापमान झटकन वाढणे, 益々 (=सातत्याने)(益々精度があがる= अचूकता सातत्याने वाढणे), 一気に(= एका दमात/ झटक्यात) (熱が一気にあがる=तापमान एका झटक्यात /एकदम वाढणे), 徐々に(=हळूहळू)(徐々に物価があがる=किमतींचे हळुहळू वाढणे), じわじわ(=सावकाश/संथ गतीने)(じわじわ物価があがるकिमतींचे संथ गतीने वाढणे), だんだん(संथ गतीने/पायरी पायरीने)(だんだん失業率があがる(=बेकारीचे प्रमाण पायरी पायरीने वाढणे) ,次第に(=हळूहळू, पुढे पुढे)(次第に速度があがるतापमान पुढे पुढे वाढणे, ますます (जास्त-जास्त)、一段と(=आणखीनच/एकदम एका पायरीने/खाडकन्)(午後になると一段と気温があがった), ある程度(=काही प्रमाणात), ぽんと(=खाडकन्/एकदम)(給料がぽんとあがる= वेतन एकदम वाढले ),一向に(=अजिबात)(~ない)(一向にピッチがあがらない= पिच/आवाजाची पट्टी अजिबात वाढत नाही)
बरोबर न येणारे शब्द
「好感度があがる」असा वापर होतो परंतु「好感があがる」असे म्हणत नाहीत.
स्पष्टीकरण
[数量の増加= संख्या/प्रमाण वाढणे] हा अर्थ क्र. १ २ आणि ७ च्या [人間、物が高いところに移動する= एखादी व्यक्ती किंवा संपूर्ण वस्तू चे वरच्या दिशेने स्थलांतर] या अर्थांशी संबंधित आहे. उदाहरणार्थ विटा जशा एकावर एक चढवत जातो तशा त्या उंच उंच जातात. वेगळ्या शब्दात सांगायचे झाले तर, आपल्या आत्तापर्यंतच्या अनुभवावर आधारित यापुढे ’एखाद्या गोष्टीचे वरच्या दिशेने स्थलांतर’ असे दर्शवणारा 「あがる」हा शब्द ’ संख्या/प्रमाण वाढणे’अशा व्यापक अर्थानेही वापरला जाऊ शकतो.
समानार्थी / विरुद्धार्थी शब्द
समानार्थी上昇する(物価が上昇する)
विरुद्धार्थी शब्दさがる(物価がさがる)


13.अकर्मक क्रियापदधातुरूपあがる、上がる
पातळी/ दर्जा वाढणे
उदाहरणे
ゲームでレベルが上がった。
(व्हिडीओगेम इत्यादी गेममधील) कौशल्य सुधारले.
いつのまにか、成績があがった。
काही कळण्याच्या आत {कामगिरी सुधारली/ भरगोस यश मिळाले/प्रगती झाली}.
学生:「勉強しても成績が上がらないんです。」教師:「勉強の仕方をかえてみたらどうですか。」
विद्यार्थी: 'अभ्यास करूनही काही प्रगती होत नाहिये.' शिक्षक :अभ्यासाची पद्धत बदलून पहा बरं.'
好きなアイドルの人気が上がり、コンサートのチケットが手に入らなくなった。
माझ्या आवडत्या आयडॉलची लोकप्रियता वाढली आणि त्याच्या कार्यक्रमाची तिकिटे मिळणे दुरापास्त झाले.
調子があがらず、二軍に落ちた。
परफॉरमन्स मधे सुधारणा न झाल्यामुळे/फॉर्म गेल्यामुळे संघाच्या दुय्यमस्तरीय टीममधे रवानगी झाली.
田中さんは、今回の企画が成功し、一段と評価があがった。
श्री. तानाका हे यावेळी धंद्यात यशस्वी झाले आणि त्यांची पत वाढली.
एकत्र वापरले जाणारे शब्द
पातळी/दर्जा वाढणे
レベル(दर्जा), 水準(पातळी), 評価 [(एखाद्या व्याक्ती बद्दलचे) मत), 調子(मूल्य /पत/, स्थिती), 腕(कौशल्य), 腕前(पात्रता), 効率(कार्यक्षमता), 能率(काम करण्याचा दर्जा), 地位(हुद्दा/दर्जा), 成績 [(फलित) (result/outcome)], 業績(कार्यक्षमता/मिळकत), 人気(लोकप्रियता), 士気(नीतिधैर्य), 順位(क्रम/स्तर), 番付[स्तर/क्रमवारी (सुमो मल्लांची वगैरे)], ランキング(रॅंकिंग/क्रमवारी), 点数 [गुण (marks)], 恋愛運 (प्रेमसंबंधासंबंधीत नशीब), 仕事運(कारकीर्द/ कामासंबंधी नशीब), 金運(पैशांसंबंधी नशीब)
どんどん(वेगाने)(कार्यक्षमता वेगाने वाढणे), ぐんと(=लक्षणीयरित्या, विलक्षण)(कौशल्य लक्षणीय रित्या वाढणे), ぐっと(एकदम/चांगलाच)(ぐっと評価があがる= पत/दर्जा एकदम/चांगलीच वाढणे, ぐんぐん(=झटकन)(ぐんぐん成績があがるप्रगती झटकन होणे, 益々 (=सातत्याने)(益々能率があがる= कार्यक्षमता सातत्याने वाढणे), 一気に(= एका दमात/ झटक्यात) 評価が一気にあがるपत/दर्जा एका झटक्यात /एकदम वाढणे), 一段と(一段と能率があがる= कार्यक्षमता एकदम वाढणे), ぽんと(ぽんとランキングがあがる) (रँकिंग एकदम/खाडकन्‌ वाढणे), 徐々に(徐々に順位があがる= हळुहळू दर्जा वाढणे)、だんだん(हळुहळू)(だんだん人気があがる) (लोकप्रियता हळुहळू वाढणे), 次第に(क्रमाक्रमाने हळुहळू) (次第に調子があがる) (परिस्थिती हळुहळू सुधारणे), じわじわ(संथ गतीने)(じわじわ腕前があがる), (संथगतीने कौशल्यात वाढ होणे), 一向に[~ない](一向に調子があがらない)= परिस्थिती अजिबात सुधारत नाही)
स्पष्टीकरण
「点数があがる」 यामध्ये अर्थ क्र. १२ 「数量の増加」आणि येथे दिलेला「レベルの向上」या दोन्हीची वैशिष्ट्ये सामावलेली आहेत असे म्हणता येईल. म्हणजेच जेव्हा ’परिक्षेतील गुण ७० वरून ९० पर्यंत वाढले’ तेव्हा 「数量の増加」या बरोबरच 「レベルの向上」सुद्धा होतो. हे उदाहरण सदर दोन अर्थांना जोडणारा सेतू किंवा बांध असून सदर अर्थप्रयोग मधे मात्र「レベルの向上」ह्या अर्थावर भर आहे.
समानार्थी / विरुद्धार्थी शब्द
समानार्थी上昇する(評価が上昇する)
विरुद्धार्थी शब्दさがる(評価がさがる)


14.अकर्मक क्रियापदधातुरूप上がる、挙がる
परिश्रमाच्या फळाचे अवतरण /फलाची प्राप्ती
उदाहरणे
会社の売り上げが上がった。
कंपनीची उलाढाल वाढली.
治療の効果が上がらない。
उपचारांचा परिणाम होत नाहीये.
会社の収益が上がりはじめた。
कंपनीचे उत्पन्न वाढू लागले आहे.
努力はしているが、仕事の業績が上がらない。
मी खूप परिश्रम तर करतोय पण परफॉरमन्समधे सुधारणा होत नाहीये.
長年の努力が実り、ようやく成果があがった。
अनेक वर्षांच्या मेहेनतीला फळ प्राप्त होऊन सरतेशेवटी घवघवीत यश मिळाले.
एकत्र वापरले जाणारे शब्द
इच्छित फल
効果(परिणाम/फलित), 成果(फल), 実績(प्रत्यक्ष परिणाम), 収益(मिळकत), 利益(नफा/फायदा), 売上(विक्री/उलाढाल)
आनुषंगिक क्रियाविशेषणे
はっきり(と)(=स्पष्टपणे) (はっきりと成果があがったस्पष्टपणे फलप्राप्ती वाढली)、一段と(=आणखीनच)(一段と効果があがるपरिणाम आणखीनच वाढणे)、一向に(=अजिबात) (~ない)(一向に利益があがらない नफा अजिबात न वाढणे)
आनुषंगिक माहिती成果 च्या इंग्रजीतील result या अर्थाबद्दल फलप्राप्ती/परिणाम असे शब्द वापरले आहेत.
स्पष्टीकरण
या ठिकाणी 「成果の出現」हा अर्थ अर्थ क्र. ९「気体の出現」आणि अर्थ क्र. १० 「声の発生」या अर्थांपासुन अर्थविस्ताराने निर्माण झालेला विस्तारित/व्यापक अर्थ आहे असे म्हणता येईल कारण अस्तित्वात नसलेली गोष्ट अस्तिवात येणे/निर्माण होणे असा समान अर्थ या तीन अर्थांमधे समाविष्ट आहे. यातील एक गोष्ट (वायुरूप पदार्थाचे दृष्टोत्पतीस येणे) दृष्टीला जाणवते, दुसरी गोष्ट (आवाजाची निर्मिती होणे) श्रवणाने जाणवते पण परिश्रमाच्या फळाचे अवतरण ही गोष्ट मात्र पंचेंद्रियांना जाणवणारी नसून त्याच्या आकलनासाठी बुद्धिमत्तेची आवश्यकता असते. अशा प्रकारे परिश्रमाच्या फळाचे अवतरण हा अर्थ अमूर्त स्वरूपाचा आहे असे म्हणता येईल.「成果の出現」आणि अर्थ क्र. १३ 「レベルの向上」या दोन अर्थांमध्येही「望ましいこと」(=इच्छित गोष्ट) ही समान असल्याचे दिसते. विशेष लक्षात घेण्यासारखा मुद्दा म्हणजे अर्थ क्र. १२ 「数量の増加」च्या उदाहरणात्मक वाक्यात 「給料があがる」(=वेतन वाढणे) अशा प्रकारची ’इच्छित गोष्ट’ समान असल्याचे दिसते आणि त्यामुळे त्याकडे 「成果の出現」 अशा अर्थानेही बघितले जाऊ शकते (अर्थात「物価があがる」ही गोष्ट ’इच्छित’ नक्कीच नाही). म्हणजेच 「給料があがる」 हा अर्थ「数量の増加」आणि「成果の出現」या दोघांमधील वैशिष्ट्ये असलेला मधलाच अर्थ आहे. अशा रितीने「数量の増加」आणि「成果の出現」अशी दोन्ही वैशिष्ट्ये एकाचवेळी असून त्यातील दुसऱ्या वैशिष्ट्यावर भर देणारा असा हा अर्थ आहे.
समानार्थी / विरुद्धार्थी शब्द
समानार्थी出る(成果が出る)
विरुद्धार्थी शब्द


15.अकर्मक क्रियापदधातुरूपあがる、上がる
(उच्च) शिक्षणसंस्थेत नव्याने दाखल होणे
उदाहरणे
この四月から末っ子が小学校にあがる。
येत्या एप्रिल पासून धाकटा/धाकटी प्राथमिक शाळेत जाईल.
娘が中学校にあがった。
(माझी) मुलगी प्राथमिक शाळेत गेली.
「お子さん、おいくつ。」「今年の春に小学校に上がったばかりなんです。」
'आपले चिरंजीव किती वर्षांचे झाले? (आपली कन्या किती वर्षांची झाली?)' 'या वसंत ऋतूत तर (एप्रिल) प्राथमिक शाळेत जायला लागलीय.
息子は中学校に上がると野球部に入った。
(माझा) मुलगा माध्यमिक शाळेत गेल्यावर त्याने बेसबॉलच्या क्लब मध्ये प्रवेश घेतला.
子供が小学校に上がったら、仕事に復帰しようと思っています。
मुलगा प्राथमिक शाळेत गेल्यावर मी परत काम/नोकरी सुरु करावे असे म्हणतेय.
आनुषंगिक माहितीजपानमधे लग्न केल्यावर अथवा मूल झाल्यावर नोकरी सोडून देणाऱ्या स्त्रीयांची संख्या लक्षणीय आहे. विभक्त कुटूंब पद्धती (मूलांचा सांभाळ करणाऱ्या आजी-आजोबांचा अभाव), भारतासारख्या स्वस्त मोलकरणी व मूल संभाळणाऱ्या दायींचा अभाव, तसेच सरकारी पाळणाघरांचा तुटवडा अश्या सामाजिक समस्यांमुळे स्त्रीयांना मूले प्राथमिक शाळेत जाईपर्यंत नोकरी करणे शक्य होत नाही.
一番下の子が、幼稚園に上がったので、自分の時間が増えた。
सर्वात धाकटा/धाकटी पूर्व प्राथमिक शाळेत जाऊ लागल्याने माझा स्वतःसाठीचा वेळ वाढला.
stairs4月から上の子は中学校に、下の子は小学校にあがります
एकत्र वापरले जाणारे शब्द
(उच्च) शिक्षणसंस्था
学校(शाळा), 幼稚園[बालवाडी(KG)], 小学校(प्राथमिक शाळा), 中学, 中学校(माध्यमिक शाळा), 高校, 高等学校(कनिष्ठ महाविद्यालय)
आनुषंगिक माहितीजपानमध्ये प्राथमिक शाळा: पहिली ते सहावी, माध्यमिक शाळा: ७ वी ते ९ वी आणि कनिष्ठ महाविद्यालय: १० वी ते १२ वी.
बरोबर न येणारे शब्द
(उच्च) शिक्षणसंस्था
大学[(महाविद्यालय /विद्यापीठ), 大学院 (पदव्युत्तर महाविद्यालय/विद्यापीठ/graduate school)]
आनुषंगिक माहिती大学院 याचा इंग्रजी प्रतिशब्द graduate school असा आहे. त्याचा अर्थ 'पहिली पदवी (B. A., B. Sc. वगैरे ) प्राप्त केलेला विद्यार्थी' जेथे शिकतो ते graduate school. पण आपण अशा संस्थेला post graduate college असे म्हणतो.
स्पष्टीकरण
「あがる」चा शिक्षणसंस्था विषयक अर्थ हा「レベルの向上」(अर्थ क्र. १३ =दर्जा वाढणे)याचे व्यापक स्वरूप आहे असे म्हणता येईल. याचे कारण असे की, ’एखादी व्यक्तीचे एखाद्या शिक्षण संस्थेशी संलग्नित नसण्याच्या अवस्थे कडून संलग्नित असण्याच्या अवस्थेकडे जाणे’ किंवा ’जास्त वरच्या दर्जाच्या शिक्षण संस्थेत दाखल होणे’ ही गोष्ट म्हणजे एका दृष्टीने ’एखाद्या व्यक्तीचा दर्जा वाढणे’ यासारखी आहे.
आनुषंगिक माहिती सामान्यतः 「大学にあがる」असा वापर करत नाहीत.
समानार्थी / विरुद्धार्थी शब्द
समानार्थी入る(中学校に入る)
विरुद्धार्थी शब्द出る(高校を出る)


16.अकर्मक क्रियापदधातुरूपあがる、上がる
तणावाखाली असणे
उदाहरणे
めずらしく花子があがっている。
आश्चर्याची गोष्ट आहे पण हानाको (स्टेजवर, वर्गामधे वगैरे लोकांसमोर हजर झाल्यावर्) टेन्शन येऊन पुरती गोंधळून गेलेली आहे.
山田さんの前ではいつも上がってしまう。
मादांच्या समोर गेलो की मी नेहमी गोंधळून जातो.
太郎は、学会の発表であがってしまった。
कॉन्फरन्समधे शैक्षणिक सादरीकरणाच्या वेळी तारो च्या मनावर दडपण आले आणि तो पुरता गोंधळून गेला.
田中さんがあがっているのがわかった。
तानाका हे तणावाखाली असल्याचे जाणवले.
試合であがるような選手はだめだ。
सामन्याच्या वेळी मनावर दडपण येणारा खेळाडू काही कामाचा नाही.
人前で話すとあがってしまう。
लोंकासमोर बोलताना माझ्या मनावर दडपण येऊन मी गोंधळून जातो.
stairs結婚披露宴でスピーチしたが、大勢の人を前にしてあがってしまった
एकत्र वापरले जाणारे शब्द
व्यक्ती
कोणतीही व्यक्ती
स्पष्टीकरण
「あがる」या क्रियापदाने <मानसिक शांतता ढळणे> किंवा <मनावर ताण येणे> हे का बरे सूचित केले असावे? जपानी भाषेमधे ’हृदय’ किंवा ’मन’ हे वास्तव्य करत असलेले शाररीक अवयव ’पोट’, ’छाती’ आणि ’डोके’ वगैरे आहेत असे समजलं जाऊ शकते. उदाहरणार्थ 「腹が据(すわ)わ(ってい)る= धैर्यवान/निश्चयी/腹を括(くく)る=निर्णय घेणे」「胸が一杯になる=ऊर (अभिमनाने वगैरे) भरून येणे/胸(むね)を躍らせる= उत्तेजित होणे」「頭(あたま)に来る= संताप उफाळून येणे/頭に血がのぼる= तळपायाची आग मस्तकापर्यंत जाणे」अशासारखे वाक्प्रचार जपानी भाषेत आहेत. मनाची संतुलित आणि समाधानकारक अवस्था ही शाररीक अवयवांमधे त्यातल्या त्यात शरीराच्या खालच्या भाग असलेल्या "पोटा" मधे वास्तव्य करीत असते असे गृहित धरले जाऊ शकते. हि गोष्ट 「腹が据(すわ)わ(ってい)る」या वाक्प्रचारात <मनाची अवस्था कोणत्याही परिस्थितीत ढळणारी नाही>असा अर्थ अभिप्रेत आहे यावरून लक्षात येते. यापुढे जाऊन 「落ち着く」 अशासारख्या वाक्प्रचारांवरूनही हेच लक्षात येते की, 「(心が)下方(かほう)に移動する/位置する」(= ’हृदय’ हे खालच्या दिशेने जाणे/असणे) यावरून <(心が)安定した状態になる/状態である= हृदय संतुलित अवस्थेत असणे> हे सूचित होते. याविरुद्ध 「浮(うわ)つく(浮ついた)=(यश इत्यादिने) पाय जमिनीवर न टेकून हवेत तरंगणे/」「頭に来る」अशांसारखे「(心が)上方に移動する/位置する」(= ’हृदय’ हे वरच्या दिशेने जाणे/असणे) हे दाखवणारे वाक्प्रचार मनाची अस्थिरता दाखवतात. अशा रितीने वरच्या दिशेने जाणे सूचित करणारे 「あがる」हे <緊張(きんちょう)する=मनावर ताण येणे>असा एका प्रकारे<(心が)不安定な好ましくない状態になる=मनाच्या अस्थिर आणि असमाधानकरक अवस्थेकडे जाणे>हा अर्थ सूचित करते हे समजू शकते.
आनुषंगिक माहितीमराठीत देखील ’जीव भांड्यात पडणे’ =हायसे वाटणे व हवेत तरंगणे किंवा डोक्यात जाणे असे मनाची खालच्या व वरच्या दिशेत होणारी हालचाल सूचित करणारे वाक्प्रचार आहेत.
समानार्थी / विरुद्धार्थी शब्द
समानार्थी緊張する(聴衆を前にして緊張する)
विरुद्धार्थी शब्द落ち着く(落ち着いて話す)


17.अकर्मक क्रियापदधातुरूपあがる、挙がる
लक्ष वेधून घेण्याजोगे होणे
उदाहरणे
リストに花子の名前があがっていた。
यादीमध्ये हनाकोचे नाव आले.
山田部長のことが話題にあがった。
विभाग प्रमुख यामादांबद्दल (यामादांच्या कृत्याबद्दल) चर्चा झाली.
環境問題や温暖化の問題が話題としてあがった。
पर्यावरण आणि तापमान वाढ हे विषय चर्चेत आले.
たくさんの名前があがっているリストを見て驚いた。
बऱ्याच लोकांची नावे असलेली यादी पाहून आश्चर्यचकित झालो.
田中さんの名が候補にあがり、会場がざわついた。
श्री. तानाका यांचे नाव उमेदवारांच्या यादीत आल्यामुळे सभास्थानी {गोंगाट सुरु झाला/ कुजबूज सुरु झाली.
長者番付にあがっている名前は有名人ばかりだ。
अति श्रीमंतांच्या यादीतील नावे केवळ नावाजलेल्या व्यक्तींचीच आहेत.
एकत्र वापरले जाणारे शब्द
एखादी व्यक्ती/गोष्ट
नाव, नाव/कीर्ती
लक्ष विधून घेण्याजोगी स्थिती/परिस्थिती
候補(उमेदवार),リスト(のトップ)(यादीतील (सर्वात वरचा)), 名簿(नावांची यादी), ラインナップ(लाईन अप), ランク(क्रमवारी/ rank), 上位(वरचा दर्जा), 筆頭(यादीतील पहिला), ノミネート(नाम-निर्देशित (नॉमिनेट)), 話題 (विषय (topic/subject)), 議題(चर्चेचा विषय, अजेंडा), 課題(विषय (दिलेला वगैरे)/ topic], 俎上(टेबलावर (चर्चेसाठी) आलेला विषय)
आनुषंगिक क्रियाविशेषणे
続々(と)(続々と名前があがる (=एकामागून एक/सातत्याने) सातत्याने नाव झळकणे
स्पष्टीकरण
’कलाकाराचे स्टेजवर येणे’ ’जाहिरातीसाठीचा फुगा (आकाशात) वर जाणे’ या उदाहरणंवरूनसुद्धा समजण्यासारखे आहे की ’व्यक्ती असो किंवा वस्तू असो, तिचे वरच्या दिशेने जाणे/ स्थलांतर’ झाल्यामुळे (अर्थ क्र. १,२ आणि ७ या अन्वये) ती ’नजरेत भरण्याच्या किंवा लक्ष वेधून घेण्याच्या परिस्थितीत’ येते. यावरून 「あがる」म्हणजे ’व्यक्ती किंवा वस्तूचे लक्ष वेधून घेण्याच्या परिस्थितीत जाणे’ असा व्यापक अर्थ असल्याचे समजू शकते.
समानार्थी / विरुद्धार्थी शब्द
समानार्थीなる(話題になる)
विरुद्धार्थी शब्द


18.अकर्मक क्रियापदधातुरूपあがる、挙がる、揚がる
सापडणे
उदाहरणे
大捜査によって、ようやく犯人があがった。
बराच शोध घेतल्यावर शेवटी गुन्हेगार सापडला.
「証拠はあがっているんだぞ。お前が犯人なんだろ。」「私は何もやっていません。」
"पुरावा सापडलाय. तूच गुन्हा केला आहेस ना?"
あそこの川で死体があがったそうだ。
त्या नदीमध्ये मृतदेह तरंगून वर अवतरलाय म्हणे.
たとえ犯人があがったとしても、遺族の悲しみは消えないだろう。
गुन्हेगार सापडला असे जरी गृहीत धरले तरी मृतांच्या वारसांचे दु:ख काही कमी होणार आहे का?
確かな証拠があがるまでは、彼が犯人だとは断定できない。
सबळ पुरावा मिळाल्याशिवाय तो गुन्हेगार आहे असे खात्रीपुर्वक म्हणता येणार नाही.
警察は、彼が事件の容疑者であるとは言ったが、証拠があがっているとは言わなかった。
तो या घटनेतील संशयित असल्याचे पोलीस सांगत आहेत, पण त्याच्याबद्दल पुरावा मिळाल्याचे सांगत नाहीत.
एकत्र वापरले जाणारे शब्द
शोधली जात असलेली व्यक्ती/वस्तू
गुन्हेगार, मृतदेह, पुरावा
आनुषंगिक क्रियाविशेषणे
次々(と)=एकामागून एक [(次々証拠があがる) एकामागून एक पुरावे मिळणे]
बरोबर न येणारे शब्द
शोधली जात असलेली व्यक्ती/वस्तू
लग्नासाठीचा जोडीदार
स्पष्टीकरण
हा अर्थसुद्धा अर्थ क्र. १७ या प्रमाणे (१,२ आणि ७ अन्वये) ’व्यक्ती असो किंवा वस्तू असो, तिचे वरच्या दिशेने जाणे/ स्थलांतर’ झाल्यामुळे ती ’सहज नजरेस येण्याच्या’ परिस्थितीत येते (आणि त्यामुळे ’सहज सापडू शकेल’ अशा अवस्थेत येते) यावर आधारित आहे असे म्हणता येईल.
समानार्थी / विरुद्धार्थी शब्द
समानार्थी見つかる(犯人・証拠が見つかる)
विरुद्धार्थी शब्द


19A.अकर्मक क्रियापदधातुरूपあがる、上がる
काम पूर्ण होणे
उदाहरणे
एकत्र वापरले जाणारे शब्द
काम/कार्य वगैरे
काम, हस्तलिखित
बरोबर न येणारे शब्द
「原稿があがる=लेख, निबंध, शोधनिबंध लिहून पुर्ण होणे」 असे म्हणता येते परंतु 「執筆があがる=लिखाणकृती पुर्ण होणे」 असे म्हणत नाहीत.
समानार्थी / विरुद्धार्थी शब्द
समानार्थी終わる(仕事が終わる)
विरुद्धार्थी शब्द


19B.अकर्मक क्रियापदधातुरूपあがる、上がる
खेळ संपणे/पूर्ण होणे
उदाहरणे
双六は、いつも花子が一番にあがる。
सुगोरोकु (पटासारखा दान फेकुन खेळला जाणारा खेळ) मधे हानाको नेहमीच सर्वात आधी सुटते.
太郎が人生ゲームであがった。
तारो हा जिन्सेई गेम नावाच्या गेम मध्ये सुटला.
आनुषंगिक माहिती人生ゲーム ही game of life नावाच्या खेळाची जपानी आवृत्ती आहे.
田中さんが一番に上がってしまう。
(खेळात) तानाका सर्वात पहिले सुटतात.
上がった人から、ジュースを飲んでいる。
जो जो सुटेल तो तो क्रमाक्रमाने ज्युस पित आहे.
ゲームで一番にあがると、気持ちがいい。
खेळात सर्वात प्रथम पूर्ण केल्यावर छान वाटते.
早く上がらないと、次郎が上がってしまう。
लवकर सुटलो नाही तर जिरो माझ्याआधी सुटून जाईल.
एकत्र वापरले जाणारे शब्द
व्यक्ती
कोणतीही व्यक्ती
खेळ
双六 (सुगोरोकु), 麻雀 (माऽजान) (सुगोरोकु/माऽजान ही खेळांची (board games) नावे आहेत.)


19C.अकर्मक क्रियापदधातुरूपあがる、上がる
(खर्च) एका मर्यादेत होणे/भागणे
उदाहरणे
もっと安くあがりませんか。
अजून स्वस्तात (कमी खर्चात) भागणार नाही का?
今回の旅行は安く上がった。
यावेळचा प्रवास कमी खर्चात झाला.
旅費が思ったより安くあがった。
प्रवासखर्च अपेक्षेपेक्षा कमी झाला.
ねばったおかげで、安くあがってもうけた。
चिकाटीपूर्वक घासघीस केल्याने कमी खर्चात काम होऊन फायदा झाला.
安くあがってもうけた金で散財した。
खर्च कमी झाल्यामुळे मिळालेले पैसे उधळून टाकले.
एकत्र वापरले जाणारे शब्द
खर्च
費用 (खर्च)、経費 (खर्चाची रक्कम)、パーティー(の費用)(पार्टी (चा खर्च))、旅行(の費用)(प्रवासा (चा खर्च))
ठराविक मर्यादा
एन (येन), किफायतशीर/स्वस्त
विशेषणाचे क्रियाविषेशणात्मक रूप
स्वस्तात
समानार्थी / विरुद्धार्थी शब्द
समानार्थी済む(安く済む)
विरुद्धार्थी शब्द


19D.अकर्मक क्रियापदधातुरूपあがる、上がる
(पाऊस) थांबणे
उदाहरणे
ようやく雨があがった。
शेवटी एकदाचा पाऊस थांबला.
九州地方は梅雨が上がったそうだ。
क्युशु भागातील पावसाळा संपल्याचे समजले.
आनुषंगिक माहिती त्सुयु म्हणजे मे ते जून या दोन महिन्यामधे सलगपणे पाऊस पडणारा पावसाळा. पावसाळ्याच्या सुरुवातीला 梅雨入りअसे म्हणतात व पावसाळ्याच्या शेवटाला 梅雨明けअसे म्हणतात. पावसाळ्या व्यतीरिक्तच्या काळामधेही जपानमधे पाऊस पडतो पण सलगपणे नाही.
「雨、もう上がったかな。」「ううん、まだ降ってるよ。」
'पाऊस थांबलाय/उघडलाय का नाही?' ' 'छे, अजून पडतोच आहे हं.'
雨が上がったので、自転車で出かけた。
पाऊस उघडल्यामुळे सायकलवर बाहेर पडलो.
雨が上がったら出かけよう。
पाऊस उघडल्यावर जाऊया रे.
お昼ごろには雨もあがり、晴れ間が広がる見込みです。
दुपारच्या सुमारास पाऊस थांबेल आणि उघडीपही वाढण्याची शक्यता आहे.
एकत्र वापरले जाणारे शब्द
पाऊस
雨(पाऊस), 梅雨(पावसाळा)
आनुषंगिक क्रियाविशेषणे
一向に[~ない]अजिबात (~नाही)(一向に雨のあがる気配がない) (पाऊस थांबण्याचे लक्षण अजिबात नाही), いつの間にか(いつの間にか雨があがっていた)
बरोबर न येणारे शब्द
「雪があがる」 असे म्हणत नाहीत. सर्वसाधारणपणे 「雪がやむ」 असे म्हणतात.
स्पष्टीकरण
पाऊस बराच पडण्याचा ऋतु (पावसाळा) संपला या अर्थी 「梅雨があがる」असेही म्हणतात.
समानार्थी / विरुद्धार्थी शब्द
समानार्थी止む(雨が止む)
विरुद्धार्थी शब्द


19E.अकर्मक क्रियापदधातुरूपあがる、上がる
(बॅटरी) डिस्चार्ज होणे/उतरणे/ संपणे
उदाहरणे
車のバッテリーがあがってしまった。
कारची बॅटरी उतरली/ डिस्चार्ज झाली आहे.
渋滞のときはバッテリーが上がりやすい。
वाहतुकीची कोंडी झाल्यावर बॅटरी उतरण्याची शक्यता वाढते.
車の室内灯を消し忘れて、バッテリーがあがってしまった。
कारच्या आतले दिवे बंद करायचे विसरल्यामुळे बॅटरी उतरून गेली.
車のバッテリーが上がってしまい、エンジンが掛からなくなった。
कारमधील बॅटरी उतरल्यामुळे ती चालू होत नाहीये.
「バッテリーが上がっちゃうから、ハザード消して。」「うん、わかった」
'बॅटरी उतरू नये म्हणून इमर्जन्सी लाईट बंद ठेव.' 'हो (ठेवतो)'.
एकत्र वापरले जाणारे शब्द
बॅटरी
बॅटरी
बरोबर न येणारे शब्द
बॅटरी
बॅटरी
समानार्थी / विरुद्धार्थी शब्द
समानार्थी切れる(バッテリーが切れる)
विरुद्धार्थी शब्द


19F.अकर्मक क्रियापदधातुरूपあがる、揚がる
(तळण/ तळलेला पदार्थ) तयार होणे
उदाहरणे
てんぷらがあがる。
तेंपुरा तळून तयार झाला.
フライがあがった。
फ्राय तळून तयार झाला.
カツがおいしくあがったよ。
कटलेट छान तळले गेलेय गं/रे.
えびフライがあがった直後に、夫が帰ってきた。
झिंगेफ्राय तळून होतातोच नवरा घरी आला.
「カツがあがったから、食べてね」「いただきまーす。」
"कटलेट तयार आहेत तर खाऊन घे." "हो, खायला सुरवात करतो."
आनुषंगिक माहिती जपानमधे खायला सुरुवात करण्याआधी दोन्ही हात जोडून इतादाकिमासु असे म्हणण्याची प्रथा आहे.
この油を使えばカラッとしたてんぷらがあがります。
हे तेल वापरले तर तेंपुरा कुरकुरीत होतो.
stairsえびの天ぷらがからっとあがりました。
एकत्र वापरले जाणारे शब्द
खाण्याचा तयार पदार्थ
तेंपुरा, फ्राय, कटलेट, प्रॉन्स/झिंगे
आनुषंगिक क्रियाविशेषणे
खुसखुशीत (तेंपुरा खुसखुशीत तळला गेला.)
स्पष्टीकरण
वर दिल्याप्रमाणे, अर्थ क्र. १९ मधील साधारणपणे ’संपणे/पूर्ण होणे’ असा समान अर्थाचा धागा असणाऱ्या- 「あがる」चे ६ अर्थांमध्ये वर्गीकरण केले आहे. त्या ६ अर्थांच्या आनुषंगिक शब्दांना त्यांच्या-त्यांच्या मर्यादा आहेत. 「終了・完成」हा अर्थ क्र. १३「レベルの向上」、अर्थ क्र. १४ 「成果の出現」चा व्यापक अर्थ समजता येईल. याचा अर्थ असा की, 「レベル/腕前があがる」वगैरे इच्छित अशा शेवटच्या किंवा सर्वोच्च पातळीच्या दिशेने ’यश/फायदा वाढणे’ वगैरे यासारखे अर्थही यात अभिप्रेत आहेत असे म्हणता येईल.
समानार्थी / विरुद्धार्थी शब्द
समानार्थीできる(天ぷらができる)
विरुद्धार्थी शब्द


ध्येयस्थळ
もしも受賞のあかつきには舞台に上がってオスカーを受け取る。
 (淀川長治著 『淀川長治ぼくの映画百物語』, 1999, 7 芸術・美術)
タキシード姿の司会者が、再びステージに上がっていた。
 (日下圭介著 『「天の酒」殺人事件』, 1991, 9 文学)
しかし、リングに上がれば、どちらもトランクス一枚の裸になる。
  (岡嶋二人著 『ダブルダウン』, 2000, 9 文学)
ある嵐の日のこと、パパは屋根に上がって修理をしようとした。
  (アニータ・アルバラード著;轟志津香訳 『わたしはアニータ』, 2002, 2 歴史)
甲板に上がり、陸地をしみじみと眺めていると、じわっと涙が出てきました。
  (帚木蓬生著 『安楽病棟』, 2001, 9 文学)
千代の富士が引退を決意した日の土俵に上がった千代の富士を見た行司が「千代の富士が小さく見えた」といっています。
  (岡崎久彦著 『なぜ気功は効くのか』, 2003, 4 自然科学)
(ダルビッシュ投手は)ブルペンではあまり良くなかったのに、マウンドに上がると申し分ない投球を見せてくれた。
 (Yahoo!ブログ, 2008, 趣味とスポーツ)
आनुषंगिक क्रियाविशेषणे
僕はゆっくりとステージに上がった。
 (K.羽音著 『君の孤独のそばで』, 2000, 9 文学)
मार्ग
階段を上がって、改札口を出る。
 (太田蘭三著 『逃げた名画』, 1989, 9 文学)
階段を上がってくる足音が聞こえた。
 (ヨースタイン・ゴルデル著;須田朗監修;池田香代子訳 『ソフィーの世界』, 1997, 9 文学)
砦の石段を上がると,たくさんの観光客が,デジカメで撮影をしていました。
 (Yahoo!ブログ, 2008, 趣味とスポーツ)
なだらかな坂を上がりきると、道の右側に天祖神社の杉林が見えてきた。
  (久世光彦著 『陛下』, 1996, 9 文学)
急勾配の丘を上がって帰るのはきついので、私は帰りはタクシーをいつも使った。
(マラ・セン著;鳥居千代香訳 『インドの女性問題とジェンダー』, 2004, 3 社会科学)
आनुषंगिक क्रियाविशेषणे
ステップをゆっくりと上がる。
  (小川裕夫編著 『日本全国路面電車の旅』, 2005, 6 産業)
激しく頭を振って涙を振り払うと、ルーホークをきっと睨みつけ、一気に階段をかけ上がっていった。
  (篠崎砂美著 『魔封の大地アンクローゼ』, 1992, 9 文学)
आरंभस्थळ
磯吉は風呂から上がると晩飯にした。
  (村岡耕治著 『はせだきの恋』, 2003, 9 文学)
はしゃぎすぎて、けっこう泳ぎ疲れてしまったぼくたちは、予定より早く海から上がった。
  (有本信雄著 『この宇宙に地球と似た星はあるのだろうか』, 2002, 分類なし)
おじさんは水から上がり、頭をぶるぶるとふって髪の毛の水を切った。
  (沢村凛著 『瞳の中の大河』, 2003, 9 文学)
三人はそれから、湯から上がって宴会場に行った。
  (莉啓著 『水辺の神々・断片』, 2002, 9 文学)
ध्येयस्थळ
船員は休暇でみんな陸に上がっています
  (梁石日著 『族譜の果て』, 1996, 9 文学)
波に足を取られそうになりながら、ザブザブと岸に上がる。
  (青木由紀子文 『「飛鳥」南極へ行く』, 2005, 2 歴史)
घराचा अंतर्भाग
幸太郎は麻理子の家に上がっていた。
  (遊直著 『オルガナー』, 2005, 9 文学)
英泉が手招きすると、若い男は遠慮しいしい座敷に上がった。
  (塩川治子著 『北斎の娘』, 2001, 9 文学)
靴を脱いで畳の部屋に上がった。
  (丹地甫著 『ハマヒルガオ』, 2005, 9 文学)
आनुषंगिक क्रियाविशेषणे
休暇中、夜になると彼女は一人こっそりと屋根裏部屋に上がっては、これまでの人生の逸品にふれていた。
  (井形慶子著 『イギリス式お金をかけず楽しく生きる!』, 2002, 5 技術・工学)
多少とも彼らの歴史的背景を知るようになった今思い返すと、日本について無知なガイジンが招かれた家の座敷に土足のままずかずかと上がってしまう、たとえれば、そんな心ない発言だったということが、わかるような気がする。
(朝比奈誼著 『デカルトの道から逸れて』, 1998, 8 言語)
इतर व्यक्तीची जागा/ठिकाण
私は文化部記者として、数日に一回、時には連日、東京・荻窪のお宅に原稿を頂きに上がった。
  (高山惠太郎監修 『酒のかたみに』, 2002, 9 文学)
ध्येय
商品はすぐにお取り寄せをいたしまして、わたくしがお届けに上がります。
  (鎌田敏夫著 『29歳のクリスマス』, 1998, 9 文学)
शरीराचा अवयव, वस्तूचा एक भाग
主審の手が高々と上がった。
 (五百香ノエル著 『ロックン・ベースボール』, 2001, 9 文学)
最後には全く足が上がらなくなってしまい、道端に腰をおろして休んだ。
 (帚木蓬生著 『逃亡』, 2000, 9 文学)
私たちが席に着くとすぐ明かりが消え、幕が上がった。
 (マーガレット・P.ブリッジズ著;春野丈伸訳 『わが愛しのワトスン』, 1992, 9 文学)
警報機の音がやみ、すぐ目の前を、かすめるようにして遮断機が上がっていく。
 (小松江里子原作・脚本;豊田美加ノベライズ 『To heart』, 1999, 9 文学)
आनुषंगिक क्रियाविशेषणे
会場では次々と手が上がった。
(古森義久著 『中国「反日」の虚妄』, 2005, 3 社会科学)
ブラインドは天井までするする上がってゆく。
 (ジョイス・キャロル・オーツ著;井伊順彦訳 『フォックスファイア』, 2002, 9 文学)
संपूर्ण वस्तू
ヘッドが下から当たる軌道では球が上がってしまいます。
 (金井清一解説・監修 『金井清一の完全バランススウィング』, 2004, 7 芸術・美術)
野球なんかでフライが上がると、高低感がわからない。
  (斎藤次郎,福尾野歩,増田喜昭著 『子どものスイッチ』, 2003, 3 社会科学)
そうやって打つと、低い弾道で飛び出した打球が途中でフワーッと上がり、しばらくして滞空して落ちていくのだ。
 (北方謙三著 『風待ちの港で』, 2003, 9 文学)
突然、おなかに響く賑やかな音がして、空に花火が上がった。
(恩田陸著 『ライオンハート』, 2004, 9 文学)
आनुषंगिक क्रियाविशेषणे
そして、一方の建物の屋上に星条旗がするすると上がり、風にはためいた。
(稲葉稔著 『熱風』, 2002, 9 文学)
पाण्याची व्याप्ती
災害後、海面の水位が上がったとは伝えられていたが、オーストラリアはこれほどではない。
  (青山圭秀著 『最後の奇跡』, 2000, 9 文学)
潮が膝まで上がってきたからだった。
 (キングズリー作;芹生一訳 『水の子どもたち』, 1996, 分類なし)
水が腰のあたりまで上がってきても、二人は水面下で手をつないだままだった。
  (マイケル・マーシャル著;嶋田洋一訳 『死影』, 2005, 9 文学)
आनुषंगिक क्रियाविशेषणे
そして、10分間で134センチと一気に水位が上がっている。
  (Yahoo!ブログ, 2008, 生活と文化)
डोळ्यांनी दिसणारा वायुरूप पदार्थ
青空に煙が一筋上がっていた。
  (立松和平作;上田朱絵 『雪より白い鳥』, 1999, 分類なし)
フェットチーネと野菜から湯気が上がらなくなったので、冷蔵庫に戻した。
  (ローレンス・ブロック編;神崎康子ほか訳 『アメリカミステリ傑作選』, 2003, 9 文学)
地震の後、東京の市街のあちらこちらで火の手が上がった。
  (岡本哲志著 『銀座』, 2003, 5 技術・工学)
次の瞬間、車のタンクに火柱が上がった。
  (森詠著 『戦場特派員』, 1996, 9 文学)
ライターの火が灯油に引火し、炎が上がったのだ。
 (小杉健治著 『父からの手紙』, 2003, 9 文学)
आनुषंगिक क्रियाविशेषणे
黒煙がもうもうと残骸から上がりだした。
  (森詠著 『戦場特派員』, 1996, 9 文学)
突然、火の手が上がった。
  (家永三郎ほか編 『日本の原爆記録』, 1991, 3 社会科学)
आवाज/ध्वनी
キャッーっという悲鳴が上がった。
  (吉村達也著 『オール』, 2002, 9 文学)
そのたびごとに拍手と歓声が上がった。
  (福島行一著 『大仏次郎』, 1995, 9 文学)
外で叫び声が上がり、勢いよくドアが開いて、あわただしい足音が店内に入ってきた。
 (ディーン・R.クーンツ著;宮脇孝雄訳 『ストレンジャーズ』, 1991, 9 文学)
その一言が引き金となったのか、全員から声援が上がる。
  (天宮一大著 『ラグビーボールを抱きしめて』, 2003, 3 社会科学)
आनुषंगिक क्रियाविशेषणे
不満の声がいっせいに上がったので、族長は片手をあげて、それを制した。
  (ローズマリ・サトクリフ著;山本史郎訳 『シールド・リング』, 2003, 9 文学)
義経はしばらくのあいだ、辺りの景色をながめていましたが、急にドッと大きな声が谷の下から上がってきました。
 (一龍斎貞水編 『歴史に残る合戦』, 2000, 分類なし)
मत
格差是正措置を求める声がすぐに上がるだろう。
 (松原聡著 『官公庁のしくみと公務員の仕事がわかる事典』, 2001, 3 社会科学)
鉄道ファンらから突然の悲報を悼む声が上がっている。
 (Yahoo!ブログ, 2008, 趣味とスポーツ)
そして、内容には女性団体からは批判と失望の声が上がった。
  (読売新聞20世紀取材班編 『20世紀大衆社会』, 2002, 2 歴史)
संख्या/प्रमाण
一時期、東京の土地の値段がものすごく上がった。
  (久野万太郎著 『リニア新幹線物語』, 1992, 6 産業)
賃金が上がれば,当然その分だけ費用もかかるので商品を値上げするであろう。
  (余語將尊,木村正信著 『現代マクロ経済学』, 2003, 3 社会科学)
もしこのままの制度で介護保険料がどんどん上がっていけば、絶対給付抑制に行きます。
  (日本障害者センター編 『障害者介護のあり方を問う』, 2004, 3 社会科学)
アルミは温度が上がると硬くなる性質があるからだ。
  (日本工業新聞社編 『決断力』, 2001, 3 社会科学)
読書のスピードが上がり、 たくさんの本が読めるようになりました。
  (Yahoo!ブログ, 2008, 政治)
一般的には、金利が上がれば株価は下がり、金利が下がれば株価は上がります。
  (大和総研著 『経済のしくみ』, 1995, 3 社会科学)
交感神経が興奮すると心拍数が増え、末梢の血管が収縮して血圧が上がります。
 (谷口正幸,池上保子著 『高血圧』, 2000, 4 自然科学)
従来の制度は、社員の年齢が上がるとともに人件費は増大していく構造にある。
  (溝上憲文著 『隣りの成果主義』, 2004, 3 社会科学)
आनुषंगिक क्रियाविशेषणे
すると、どんどん株価が上がっていく。
  (中島孝志著 『35歳までに決まる!お金持ちになれる人なれない人』, 2003, 1 哲学)
渋滞のノロノロ運転でイライラすれば、さらに血圧は上がります。
  (中原英臣,富家孝著 『医者しか知らない危険な話』, 1995, 4 自然科学)
これができれば、店としても、個人としても、成功の確率がグンと上がるに違いありません。
  (河原成美著 『一風堂五輪書』, 2004, 1 哲学)
ここにタレントを出演させれば一気に知名度が上がるため、各事務所は鵜の目鷹の目で狙っている。
藤本ひとみ著 『綺羅星』, 1998, 9 文学)
毎月、徐々に売上げは上がっているのに、依然、会社は赤字のままだ。
 (福永正三著 『会社再建』, 2004, 5 技術・工学)
農家の平均年齢はだんだん上がっていて、今日では六十一歳だと聞いています。
  (中村靖彦著 『遺伝子組み換え食品を検証する』, 1999, 4 自然科学)
ローンの金利(住宅)についてですがじわじわここのところ上がりはじめていますよね。
  (Yahoo!知恵袋, 2005, ビジネス、経済とお金)
物価はますます上がり、物不足はますます深刻になってきた。
 (木下栄蔵著 『孫悟空はどこまで飛んだ?』, 1992, 4 自然科学)
पातळी/दर्जा वाढणे
不安が増加して首や肩の筋肉の緊張レベルが上がるのです。
  (R.M.ナイデファー,R.C.シャープ著;加藤孝義訳 『集中力』, 1995, 1 哲学)
経済が発展して生活水準が上がれば、食生活も変化する。
 (草間俊介,畑村洋太郎著 『東大で教えた社会人学』, 2005, 3 社会科学)
B評価の基準を80%から70%に下げたので、水戸くんの評価がCからBに上がりました。
  (小川祐一著 『学級経営&成績評価支援プログラム「担任くん」ガイドブック』, 2003, 3 社会科学)
どうしても調子が上がってこない、で、遂にはマウンドに行きたくないと思ったというんです。
  (江夏豊著 『プロ野球観戦術』, 1998, 7 芸術・美術)
たとえばピアノを弾くこと自体を楽しみ、腕前が上がっていく自分に誇りをもって満足することはあっただろうか、と。
  (斎藤茂太著 『「うつ」から元気になれる本』, 2004, 4 自然科学)
ショートカットキーを使って、リスト内を自由にジャンプできれば、それだけでも仕事の効率がグンと上がる。
 (井上香緒里著 『時間がない営業のための手間をかけないカンタン売上分析』, 2005, 6 産業)
आनुषंगिक क्रियाविशेषणे
キャッチ・ボールを繰り返している内に次第に下値が固まって、少しずつ水準が上がってくるだろう。
  (Yahoo!ブログ, 2008, ビジネスと経済)
日本の物価と生活水準がどんどん上がる中で、この一家の生計と伝道活動を支えること自体、かなり大変だったと思うのです。
(山下秀雄著 『日本のことばとこころ』, 1986, 8 言語)
इच्छित फल
ダンベル運動をすればより効果が上がると思います。
 (Yahoo!知恵袋, 2005, 健康、美容とファッション)
能力を発揮してこそ成果が上がる。
  (溝上憲文著 『隣りの成果主義』, 2004, 3 社会科学)
何より実効が上がらなければ意味がない。
  (Yahoo!ブログ, 2008, 政治)
実績が上がらなければ有名無実、紙にかいた絵のようなものでありますから、私たちが望むところでありません。
 (国会会議録, 1985, 参議院)
手間ばかり掛かって、収益が上がらないので嫌われます。
  (Yahoo!知恵袋, 2005, 教養と学問、サイエンス)
ある製品のマーケット・シェアを拡大すればどれくらいコストが下がり、利益が上がるのか。
  (水越豊著 『BCG戦略コンセプト』, 2003, 3 社会科学)
आनुषंगिक क्रियाविशेषणे
ギリギリのところで1〜2秒止めると運動効果がさらに上がります。
  (岩下聆監修 『手軽にかんたんフィットネス』, 2001, 4 自然科学)
(उच्च) शिक्षणसंस्था
一番下が、幼稚園に上がったばかりの男の子だった。
  (森詠著 『北のレクイエム』, 1986, 9 文学)
リズとモリーは小学校に上がったときから十四歳のときまで大の仲よしだった。
  (グレイス・グリーン作;久坂翠訳 『二人の天使』, 2002, 9 文学)
僕と青木は同じ高校に上がりました。
(村上春樹著 『レキシントンの幽霊』, 1996, 9 文学)
एखादी व्यक्ती/गोष्ट
文壇で名が上がり、相当ちやほやされても、原稿料だけでは生活はできないというのが普通だった。
  (矢崎泰久著 『口きかん』, 2003, 9 文学)
लक्ष विधून घेण्याजोगी स्थिती/परिस्थिती
各部門から選抜の候補者として上がってくる社員は、学校は東大をはじめとするブランド大学出身者ばかりですし、なかには高級官僚の子弟もいますし、毛並みは抜群です。
 (溝上憲文著 『超・学歴社会』, 2005, 3 社会科学)
現在でもGEで仕事をしているのは最初のリストに上がった二三人のうちわずか九人にすぎない。
(ジャック・ウェルチ,ジョン・A.バーン著;宮本喜一訳 『ジャック・ウェルチわが経営』, 2001, 5 技術・工学)
番付上位に上がってくる者に、ハワイやモンゴル出身者が続いている。
  (佐山和夫著 『松井秀喜の「大リーグ革命」』, 2003, 7 芸術・美術)
शोधली जात असलेली व्यक्ती/वस्तू
その3日後、ラスプーチンの死体が揚がった。
  (石田敦士著 『歩いて書いたヨーロッパの歴史』, 2004, 2 歴史)
それでも小出総合病院に犯人と思われる人間が潜んでいる情況証拠がいくつも上がってきた。
  (五十嵐貴久著 『交渉人』, 2003, 9 文学)
काम/कार्य वगैरे
従業員の忘年会は二日前にすんでいるし、仕事が上がった者から帰宅することになる。
  (笹沢左保著 『紫陽花いろの朝に死す』, 2001, 9 文学)
現場からどんな原稿が上がってくるかもわからないうちに、明日の朝刊の紙面建てが決まってしまったというのか。
  (横山秀夫著 『動機』, 2002, 9 文学)
खेळ
麻雀で、あがるのは、運(ツキ)だ。
  (色川武大,阿佐田哲也著;大庭萱朗編 『色川武大・阿佐田哲也エッセイズ』, 2003, 9 文学)
विशेषणाचे क्रियाविषेशणात्मक रूप
だからいつもスタジオ代が少しでも安く上がるように気を配ってくれた。
  (友部正人著 『ニューヨークの半熟卵』, 2003, 2 歴史)
पाऊस
ビーチには雨が上がると同時に大勢の人が出てきて、海で泳いだり、砂の上で寝ころんだりしていた。
  (海老沢泰久著 『男ともだち』, 1998, 9 文学)
そこで、梅雨が上がった後、秋口までは戸外に出し、五〇%遮光をして育てるのがよい。
  (江尻光一著 『洋ラン栽培コツとタブー』, 1991, 6 産業)
बॅटरी
その日、僕が仕事に出かけようとしたら、一トントラックのバッテリーが上がってしまっていた。
 (アンジェラ・グード編;伊藤延司,マーガレット・プライス訳 『犬たちをめぐる小さな物語』, 1994, 6 産業)
खाण्याचा तयार पदार्थ
おいしいトンカツが、もうすぐ揚がりそうよ
  (末廣圭著 『妖花』, 2003, 9 文学)
梲(うだつ)があがらない

अर्थ
出世したり、良い境遇になることができない。
उदाहरणे
Aさんは、梲があがらない亭主のことでいつも愚痴をこぼしている。
शब्दभांडारातील उदाहरणे
えっ、前の彼はどうしたかって?別れたわよ、うだつが上がらないんだもんこんな“恋愛観”が横行している。(宮崎学著 『ハンパな人生論より極道に学べ』, 2002, 1 哲学)
頭があがらない

अर्थ
相手に対して負い目を感じ、自分を下の立場におく。
उदाहरणे
・私のミスをたびたび救ってくれた部長には、頭があがらない
・指導教員は就職の世話までしてくれたので、一生頭があがらない
शब्दभांडारातील उदाहरणे
もっとも、この頃は研究が面白かったので、大学に1日15時間はいたと思う。だから、帰ってきたら、ご飯も食べずに模型工作である。奥様は当時、子育てに大変だったのだ。一生頭が上がらない所以である。 (森博嗣著 『森博嗣のミステリィ工作室』, 2001, 9 文学)
陸(おか)に/へあがった河童

अर्थ
河童は、水の中は得意であるが、陸にあがるとうまく活動できないことから、人間が、不得手な、あるいは未経験の状況におかれて、どうにもならないこと。⇔水を得た魚
V+あがる

のしあがる、まくれあがる、出来あがる、縮みあがる、すくみあがる、舞いあがる、這いあがる
あがり+V

あがり切る、あがり損なう
その他  V+あがる

飛びあがる、跳ねあがる、打ちあがる、駆けあがる、燃えあがる、成りあがる、捲れあがる、染めあがる、焼きあがる、炊きあがる、湧きあがる、繰りあがる
その他 あがり+V

あがりこむ、あがり続ける
ネコが屋根にあがって、日向ぼっこをしている。
「そちらの階段をあがって左にございます。」
中村さんが階段をあがっていきます。
中村さんが階段をあがってきます。
中村さんが急いで階段をあがっていきます。
中村さんが急いで階段をあがってきます。
「いらっしゃい。どうぞ、あがってください。」 
先生のお宅にお迎えにあがった
力士の足が出た瞬間、行司の軍配がさっとあがった
夏の夜空にきれいな花火があがっている
色とりどりの風船が空高くあがっていきます。
工場の一角から火の手があがり、またたく間に燃え広がった。
煙突から白い煙があがっています。
日本の選手がシュートを決めると、スタンドから歓声があがった
4月から上の子は中学校に、下の子は小学校にあがります
結婚披露宴でスピーチしたが、大勢の人を前にしてあがってしまった
えびの天ぷらがからっとあがりました。